Sunday 29 January 2012

गैरसमज

                                                                   गैरसमज

       माणसाचा मन किती चंचल  असताना ? नेहमी ते भटकत असता आणि काहीना काही  विचार करताच असते ...आपण झोपलो तरी मन मात्र झोपत नाही ..स्वप्ना हे देखील त्या पैकीच एक क्रिया होय ..मानवाच्या या चंचल मनात खूप मोठी शक्ती आहे..माणसे नेहमी बुद्धी  पेक्षा मनानेच विचार करतात ,म्हणूनच जनसामान्यात बोलतात ना कि " माणूस पैश्यापेक्षा मनानेच मोठा असायला हवा "                  
पण हेच मन कधी कधी एवढा खोल विचार करायला लागते आणि नकळत एक चुकीची धूसर भिंत होते त्यालाच  आपण गैरसमज म्हणतो ..अप्रत्याक्ष्य रित्या या गोष्टीना आपण कधी कधी जबाबदार असतो .आपण कधी कधी आपल्या मित्रांशी काही कारणास्तव खोटा बोलतो आणि जेव्हा त्यांना सत्य कळते तेव्हा होतात ते गैरसमज ...
            बोलतात ना एकदा कि संव्शय माणसाच्या आयुष्यात शिरला कि गैरसमजाची क्रिया सुरु होते ..त्यानंतर तुम्ही कितीही खरा बोलला तरी मानवाच्या सव्न्षयी वृत्ती मुले नेहीच गैरसमज होताच राहतात ..कितेक वेळा आपण जसा विचार करतो तसा काहीच नसता ...
बोलतात ना कि " मनी वसे ते स्वप्नी दिसे"..आपल्या मनात जे असते त्याचा संभंद आपण आपल्या समोरच्या परिस्तितीशी जोडत जातो आणि जोडीला आपली कल्पना शक्ती ची जोड घेतो आणि मग होतात ते गैरसमज ..
हे नेहमी आपल्या स्वताच्या कल्पनाशक्ती मुलेच होतात ..कधी कधी आपण रागात असल्याने होतात तर कधी कधी आपल्या ला इतरांकडून मिळालेल्या मीठमसाला लावलेल्या माहिती मुले ...न कळत जेव्हा हे आपल्या आयुष्यात शिरतात तेव्हा कलाह आणि दुख शिवाय आपल्या आयुष्यात काहीच राहत नाही ..
             या गैरसमजाचा नाम्नेश करणारा कोणताही software नाहीय कि अल्लौदिन चा जादुगार नाहीय ..याला आपण स्वताच नाम्नेश करू शकतो फक्त ..प्रतेक्वेला नकारात्मक विचार करण्या पेक्षा सकारात्मक विचार केला तर आपण याला दूर करू  शकतो ..वेळ प्रसंगी आपण ज्याला आपले बोलतो त्याला हक्काने जाऊन विचारून गैरसमज दूर  करू शकतो  पण मानवी मानवी अहंकार आडवा येतो आणि  गैरसमज लवकर दूर केले जात नाही ..जेव्हा आयुष्याच्या शेवटला आपल्याला सत्य कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि पश्यातापाशिवाय हातात काहीच नसते ...उरतात त्या फक्त आठवणी ..

  कितेकदा याच गैरसमजामुळे कितेकानी आपल्या कितेक गोष्टी गमावल्या ...कोणी मित्र-मैत्रिणी तर कोणी आपले जन्मदाते सुधा ...

भटकंती हा माझा छंद असल्याने खूप प्रवासात शिकायला मिळते बोलतात ना कि ८  वर्ष्याच्या मुलाकडून हि आपण काही तरी शिकू शकतो हवी असते ती फक्त शिकण्याची विचार शक्ती ..
असाच एकदा मडगाव - cst  एक्ष्प्रेस्स ने प्रवास करत होतो आणि मनात विचार आला कि " शहराची माणसे हि गावातल्या माणसांपेक्षा तणावग्रस्त का असतात ? '"
विचार करत करत दादर कधी आले कळलेच नाही ...,लगेच पटकन उतरून मुंबईच्या lifeline  मध्ये कसा बसा शिरलो पटकन आणि खिडकी लगतची जागा पटकावली आणि सुटकेचा निश्वास सोडला ...त्यानंतर असा काही प्रसंग घडला कि माझ्या डोक्यात लगेच क्लीच्क झाला कि  " शहरातली लोक जास्त तणावग्रस्त का असतात?".....कारण इथे गैरसमज होण्याचे प्रमाण जास्त असते ..ती लोक कितेक गोष्टी एकात आणि बघत असतात या धावपळीत आणि मग त्याचा साम्भंद आपल्या प्रकरणाशी लावतात..

    आता आपण ट्रेन मधल्या प्रकरण कडे वळूया ..माझ्या बाजूला आणि समोर दोन  मध्यम वयाची जोडपी बसली होती ..माझ्या बाजूच्या काकी काकांना त्यांच्या शेजारणीच्या मुलीच्या बाबत सांगत होत्या  कशी ती क्लास हून उशिरा येते, क्लास च्या नावाने प्रियकराला भेटते वगैरे वगैरे .....हे बोलणे ऐकताना मला माझ्या समोरच्या काकी जरा गंभीर  झालेल्या वाटल्या कारण का ? any guess ? ...कारण कदाचित त्यांची पण एक मुलगी असेल ..कदाचित ती पण क्लास हून उशिरा येत असेल आणि बहुतांशी ती त्या मुलीसारखी वागत पण नसेल पण चुकून का होईन तिझ्या आई च्या मनात तयार झाला तो हाच गैरसमज ना?

आपला पण तसाच होता ..जेवढा आपण बाहेर बघतो आणि ऐकतो त्याचा आपण आपल्या प्रकरणाशी साम्भंद जोडतो व विचार करायला लागतो पण आपण विसरतो कि जगात निरनिराळ्या विचारसरणीची माणसे असतात..कदाचित त्यांची परीस्तीती वेगळी असणार त्यावेळची जेव्हा ती घटना घडली ...

इतरांची दृष्टीकोनातून बघण्यापेक्षा आपण जर आपल्या दृष्टीकोनातून बघितला तर नक्कीच आपान गैरसमज होणे टाळू शकू
                                                          ------संदीप तुकाराम चान्दिवडे

No comments:

Post a Comment